अंबरनाथमध्ये केमिकलच्या कंपनीत भीषण आग, अंबरनाथ पुढील लोकल बंद

1

सामना ऑनलाईन । अंबरनाथ

अंबरनाथमधील मोरीवली एमआयडीसीत एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. ही आग इतकी भीषण आहे की परिसरात त्याचे धुराचे लोट पसरले आहे. या आगीमुळे अंबरनाथ पुढील लोकल सेवा बंद करण्यात आली आहे, त्यामुळे प्रवाशांचेही हाल झाले आहेत.

घटनास्थळी अग्निशमन दलाचे आठ बंब पोहोचले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आगीच्या वेळी १३ कामगार कंपनीत उपस्थित होते. कामगार वेळीच कंपनीतून बाहेर पडल्याने जीवित हानी टळली. तसेच अद्याप आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.