पुण्यात भवानीपेठेत फायबर कारखान्याला भीषण आग, अग्नीशम दलाच्या 9 गाड्या दाखल

1

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील भवानी पेठेतल्या फायबर कारखान्यात भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर आग विझवण्याचे कार्य सुरू आहे.


या भीषण आगीत अद्याप जिवीत हानी झालेली नाही. तसेच या आगीचे कारणही स्पष्ट झालेले नाही. जेव्हा कारखान्यात आग लागली तेव्हा कारखान्यात किती कामगार होते याची माहिती अजूनही कळाली नाहिये. ही आग जर आटोक्यात नाही आली तर जवळील घरेही या आगीच्या भक्ष्यस्थानी येऊ शकतात अशी भिती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.