दिल्लीत 20 हजार कोटींचे हवाला रॅकेट

1

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

नवी दिल्ली इन्कम टॅक्स अधिकाऱयांनी सोमवारी दिल्लीत 20 हजार कोटी रुपयांचे हवाला रॅकेट उद्ध्वस्त केले. नया बाजार भागातल्या एका छाप्यात 18 हजार कोटी रुपयांची बनावट बिले सापडली तर दुसऱया एका प्रकरणात मनी लॉण्ड्रिंगची टोळी शोधून काढली. आणखी एका गँगकडे विदेशी बँक खाते होते.