भावूक व्हिडीओ व्हायरल, ‘लव्ह यू’ म्हणत पत्नीचा वीर मेजरला अखेरचा सलाम

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सोमवारी दहशतवाद्यांसोबत जोरदार चकमक उडाली. या चकमकीमध्ये देहराडून येथील जवान मेजर विभूति ढौंढियाल यांना वीरमरण आले. मंगळवारी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यासह हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, ‘वीर जवान अमेर रहे’, अशा घोषणांनी आसमान दणाणून गेले.

‘लव्ह यू’ म्हणत वीर पत्नीचा अखेरचा सलाम
अंत्यसंस्कारावेळी मेजर ढौंढियाल यांच्या पत्नी निकिता यांनी शहीद पतीला I Love You म्हणत अखेरचा सलाम केला. देशासाठी प्राण अर्पण केलेल्या पतीचे पार्थिव पाहून एकीकडे डोळे पाणावले होते, तर दुसरीकडे शौर्यामुळे उर भरून आला होता. हे दृश्य पाहून उपस्थितांच्याही काळजामध्ये चर्रर्र झाले.

लग्नाच्या वाढदिवसापूर्वीच…
मेजर ढौंढियाल आणि निकिता यांचा 10 महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. 19 फेब्रुवारीला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. परंतु त्यापूर्वीच मेजर ढौंढियाल यांना वीरमरण आले.