संक्रांत फॅशन

पूजा पोवार फॅशन डिझायनर

काळानुसार संक्रांतीनिमित्त काळा रंग आणि हलव्याचे दागिने यांचे कॉम्बिनेशन असलेले विविध डिझाइनमधले ड्रेसेस बाजारात उपलब्ध आहेत.

मकर संक्रांत हा पतंगाचा सण आहे. मकर संक्रांत हिवाळ्यात (विंटर सीझन) सुरू होते. संक्रात हिंदुस्थानातील सर्व देशांमध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरी केली जाते. पंजाबमध्ये या सणाला लोधी, आसाममध्ये बीजू तर दक्षिण हिंदुस्थानात पोंगल असे म्हणतात. एकमेकांना तीळगुळ वाटून आनंद साजरा करण्याचा हा सण आहे. या सणादरम्यान हिवाळा असतो तसेच उष्णता शोषून घेण्याकरिता काळे कपडे परिधान केले जातात. पूर्वी महिला फक्त काळ्या रंगाच्या साडय़ाच परिधान करायच्या, मात्र आता काळानुसार संक्रांतीनिमित्त काळा रंग आणि हलव्याचे दागिने यांचे कॉम्बिनेशन असलेले विविध डिझाइनमधले ड्रेसेस बाजारात उपलब्ध आहेत.

काळ्या रंगाची साडी आणि त्यावर हलव्याचे सोनेरी रंगांचे कंबरपट्टा, बाजूबंद आणि नथ हे दागिने शोभा देतील. सोनेरी रंगाच्या ज्वेलरीमुळे दागिने उठून दिसण्यास मदत होईल. विशेष म्हणजे या पोशाखाला हिंदुस्थानी टचही मिळेल.

क्रॉप स्टाईल

काळा लांब कुर्त्याची क्रॉप स्टाईल सध्या बाजारात आली आहे. हा पोशाख पलाझोबरोबर घातला तर त्यावर गुलाबी, लाल किंवा शेंदरी रंगाचे दागिने घातले तर ते उठून दिसू शकतात. तसेच फक्त हार आणि कानातले अशा पद्धतीचे दागिनेही आवडीप्रमाणे परिधान करता येऊ शकतील.

मॉडर्न पोशाख

ज्या मुलींना किंवा महिलांना साडी नेसायची नाही त्यांच्याकरिता भरतकाम केलेला काळा कुर्ता परिधान केल्यास उत्तम. यावर डिशानयर किंवा आवडीप्रमाणे हलव्याचे इमिटेशन दागिने वापरता येतील. शिवाय भरतकाम केलेला क्रॉप टॉप प्लेन स्कर्टही परिधान केल्यास आकर्षक दिसेल. विशेषतः किशोरवयीन मुली संक्रांतीच्या सणाला या पोशाखात खुलून दिसतील. तरुण मुली पलाझोसोबत पाँजोझ घालण्याची फॅशन जुनी आहे, मात्र ती आता नव्याने रुढ होत आहे. लेंग्यावर कोणत्याही रंगाचा स्लिकचा लॉग टॉप घालण्याची फॅशनही सध्या बाजारात पुन्हा प्रचलित झाली आहे.

साडय़ांची रंगसंगती

प्लेन काळ्या रंगाच्या शिफॉनच्या साडीवर हिरव्या किंवा गुलाबी रंगाचा रॉ सिल्क कपडय़ातील किंवा फुलांच्या डिझाइ14नचे ब्लाऊज अधिक उठून दिसते. अशा साडय़ांवर लेसी ब्लाऊजही उठून दिसते. यावर टेम्पल किंवा साऊथ इंडियन ज्वेलरी घातल्यास सौंदर्य खुलेल.