मकरंद देशपांडेचे ‘एपिक गडबड’ लवकरच

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘बुढ्ढा होगा तेरा बाप’, ‘डरना जरुरी है’, ‘स्वदेश’, ‘कंपनी’, ‘मकडी’, ‘चमेली’, ‘सत्या’ हे हिंदी तसेच ‘रिटा’, ‘अजिंठा’, ‘पन्हाळा’, ‘दगडी चाळ’, ‘ट्रकभर स्वप्न’ या या मराठी सिनेमांमध्ये दिसणारा मकरंद देशपांडे हिंदी रंगभूमीवर दिसला होता, पण मराठी नाटकांमध्ये तो दिसला नाही. मात्र आता तो मराठी रंगमंचावर काम करणार आहे. नरेन चव्हाण, अभिजीत साटम यांच्या रुजुता प्रॉडक्शन आणि टेराकॉम एन्टरटेंटमेंट बॅनरतर्फे मकरंद लिखित-दिग्दर्शित ‘एपिक गडबड’ हे नाटक लवकरच रंगभूमीवर येतंय. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग 27 नोव्हेंबरला होणार आहे. अभिजीत आणि त्याच्या टिमने आजवर ‘मिस्टर ऍण्ड मिसेस’, ‘स्ट्रॉबेरी’, ‘एक शून्य तीन’ अशी दर्जेदार नाटके रंगमंचावर आणून स्वतःचा असा एक प्रेक्षकवर्ग निर्माण केलेला आहे. अंकित म्हात्रे, निनाद लिमये, आकांक्षा गाडे, माधुरी गकळी, भरत मोरे, अजय कांबळे, तुषार घाडिगावकर यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.