फेसवॉशऐवजी हे वापरा!

चेहरा आकर्षक दिसण्यासाठी तरूणी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. त्यासाठी मार्केटमध्ये आलेल्या महागड्या सौंदर्यउत्पादनांचा वापर करतात. पण घरातल्या घरातच असे काही पदार्थ आहेत त्यांचा वापर चेहरा धुण्यासाठी केला तर तो स्वच्छही होतो आणि चमकदारही दिसतो. घरात मध असतोच. तेलकट त्वचेवर मध खूप फायद्याचे ठरते. कारण मधामुळे चेहऱ्यावरील त्वचा आतून हायड्रेट होते. त्यामुळे त्वचेवरील छिद्रे साफ होतात आणि चेहऱ्याला मॉइश्चर मिळते.

दुसरे म्हणजे चेहरा दह्यानेही छान स्वच्छ होऊ शकतो. दही लावल्याने टॅनिंगची समस्या दूर होते. ते एक नैसर्गिक मॉइश्चरायजर असल्यामुळे दह्याबरोबर ते एखाद्या क्लिंजरसारखे काम करते. तसेच पिकलेल्या पपईने चेहऱ्यावर मसाज करून काही वेळाने चेहरा धुवून टाकायचा. यामुळे त्वचेवरील छिद्रे मोकळी होतात. बेसनमध्ये थोडे पाणी किंवा गुलाबजल मिसळून त्यानेही चेहरा धुतला तरी स्वच्छ होतो. तेलकट त्वचा आणि मुरुमांची समस्या असेल तर हा उपाय लाभदायक ठरेल.

ऍलोव्हेरा जेल लावल्यानेही त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात. याबरोबरच त्वचेची हिलिंग प्रोसेस जलद होऊ लागते. दुसरे म्हणजे कॉटनच्या कपड्यात थोडे खोबरेल तेल घेऊन चेहऱ्यावरील मेकअप साफ करा. कोरड्या त्वचेसाठी हे क्लिंजिंग ऑईलचे काम करते. लिंबू तर घरी कधीही मिळू शकणारे फळ आहे. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग तत्वे असतात. लिंबाचा रस थोडे मध आणि थोडय़ा दह्यात मिसळून चेहऱ्यावर १५ मिनिटे लावून नंतर चेहरा धुवून टाकायचा. त्वचा स्वच्छ होते.