रिंकूने घेतले ‘मेकअप’साठी 27 लाख

16

सामना ऑनलाईन, मुंबई

मराठी इंडस्ट्रीत सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांना मागे टाकून रिंकू राजगुरू ही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री ठरली आहे. नवोदित रिंकूने ‘मेकअप’ चित्रपटासाठी 27 लाख रुपये इतके मानधन घेतले आहे.

‘सैराट’ या पहिल्याच चित्रपटामुळे रिंकू राजगुरू एका दिवसात स्टार बनली. ‘या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते. ‘सैराट’या चित्रपटानंतर अनेक वर्षांनी तिचा ‘कागर’ हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या चित्रपटाला ‘सैराट’ इतकी लोकप्रियता मिळाली नसली तरी या चित्रपटातील रिंकूच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. आता लवकरच रिंकूचा ‘मेकअप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. रिंकू राजगुरूच्या ‘मेकअप’ या आगामी चित्रपटाचा टीजर काही दिकसांपूर्की प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या टीजरमध्ये रिंकू दारू पिऊन बडबडताना दिसत असून या चित्रपटातही ती एका ग्रामीण भागातील मुलीची भूमिका साकारताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या