मलाला ‘ट्विटर’वर येताच अर्ध्या तासात १ लाख फॉलोअर

सामना ऑनलाईन, लंडन

नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलेली १९ वर्षीय मलाला युसूफझाई ही ‘ट्विटर’वर येताच अवघ्या ३० मिनिटांत तिचे १ लाख फॉलोअर बनले. मलालाने फक्त ‘हाय, ट्विटर’ असे टाइप करताच फॉलोअर्सचा ओघ सुरू झाला.

मलालाचे ट्विटर अकाऊंट नोव्हेंबर २०१२ पासून आहे, मात्र तिने आज पहिल्यांदा त्यावर ट्विट केले. ‘आज माझा शाळेतला शेवटचा दिवस असून ट्विटरवरचा पहिला दिवस आहे. मी माझ्या भविष्याबद्दल उत्सुक आहे पण मला माहीत आहे की जगातील लाखो मुलींना शाळेत जाता येत नाही आणि त्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळत नाही’ असे ट्विट मलालाने केले.