मालेगावात पारा ४३ अंशांवर

49

सामना प्रतिनिधी । नाशिक

नाशिक जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज मालेगाव शहरातील कमाल तापमानात दोन अंशांची वाढ होऊन पारा ४२.६ अंशांवर स्थिरावला. नाशिकमध्येही तापमान ४०.७ अंश नोंदविले गेले. उन्हाच्या तीव्र झळांमुळे परिसर होरपळून निघाल्याचे चित्र आहे.

या मोसमात मालेगाव येथे २८ मार्चला उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. त्यानंतर ७ एप्रिलपर्यंत तापमानात काही अंशी घट झाली होती. आता पुन्हा उष्णतेची तीव्रता वाढत चालली आहे. मालेगावला काल ४०.८, तर आज ४२.६ इतके तापमान होते. नाशिकमध्ये काल ३९.९, तर आज ४०.७ अंश सेल्सिअस तापमान होते.

आपली प्रतिक्रिया द्या