१२ आँगस्टपासून झेवियर्सच्या ’मल्हार’ची धूम

सामना ऑनलाईन । मुंबई

झेवियर्स काँलेजचा मल्हार फेस्टिव्हल 12 ते 14 आँगस्टदरम्यान होणार आहे. यंदाचा मल्हार अनेक कारणांनी खास आहे. देशातील विविध क्षेञातील दिग्गजांबरोबर हिंदी रँप आणि सिंफनी आँर्केस्ट्राची ट्रीट विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मल्हारचा पहिला दिवस स्पीकर लाईनअपचा आहे. यादिवशी प्लँनिंग कमिशनचे मोंटेक सिंग अहुवालिया, माजी मंत्री पीयुष गोयल, मकरंद देशपांडे, होमी अदाजनीआ, हाँकी टीमचे माजी कर्णधार विरेन रास्किंहा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आर्टीफिशल इंटेलिजेन्स हा परिसंवादही होणार असून यात पत्रकार रोझेल लाहा, उपमन्यू घोष, अविनाश कुमार, सिद्धार्थ मेहता भाग घेतील. 13 आँगस्टला विविआन फर्नांडीस यांचा हिंदी रँपचा कार्यक्रम होईल. शेवटच्या दिवशी सिंफनी आर्केस्ट्रा आणि रिचा चढ्ढा यांचा मसान हा चित्रपटही दाखविला जाईल.