काँग्रेसमुळेच एक चहावाला देशाचा पंतप्रधान झाला!

12
गुलबर्गा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे मल्लिकार्जुन खरगे 42 हजार मतांनी पिछाडीवर आहे

सामना प्रतिनिधी । मुंबई

काँग्रेसने ७० वर्षांत देशातील लोकशाही टिकवली म्हणूनच एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकला, अशी घणाघाती टीका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

महाराष्ट्र प्रभारीपदी निवड झाल्यानंतर खरगे दोन दिवसांच्या मुंबई दौऱयावर आले आहेत. सकाळी टिळक भवन, दादर येथे ते काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर दुपारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन केले.

खरगे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ७० वर्षांत काँग्रेसने काय केले, असे मोदी विचारतात. आम्ही काही केले नसते तर मोदी त्या खुर्चीवर बसले असते का? आम्ही लोकशाही टिकवली म्हणून एक चहावाला पंतप्रधान झाला. मोदी फक्त मोठमोठय़ा घोषणा करतात, पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र दिसत नाही. रोज एक ब्रीज कोसळतोय. आधी ते थांबवा, रेल्वे ट्रक सुधारा. मग बुलेट ट्रेनच्या गप्पा मारा. देशात गोरक्षणाच्या नावाखाली लोक मारले जात आहेत. दलित, अल्पसंख्याक, आदिवासींवर अत्याचार वाढले आहेत. देशात भीतीचे वातावरण आहे असेही खरगे म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या