शिवसेना-भाजप युतीचा प्रचाराचा धडाका


सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण शहरात शिवसेना-भाजप महायुतीच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे. शहरातून पुन्हा एकदा खासदार विनायक राऊत यांना मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास शिवसेना-भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

शहरातील प्रभाग चार मध्ये रविवारी घरोघर प्रचार फेरी काढत नागरिकांना प्रचार पत्रके देऊन मतदानाचे आवाहन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, शाखा प्रमुख बंड्या सरमळकर, बांधकाम सभापती गणेश कुशे, आरोग्य सभापती पंकज साद्ये, नगरसेविका सेजल परब, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, नगरसेविका पुजा करलकर, नगरसेविका पुजा सरकारे, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, नंदु गवंडी, महेश मेस्त्री, संन्मेष परब, किसन मांजरेकर, नंदा सारंग, उषा मयेकर, संदिप शिरोडकर, अंजना सामंत, निलेश कुडाळकर, प्रमोद करलकर, दादु शिर्सेकर व अन्य शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.