Lok sabha 2019 … म्हणून ‘या’ हॉट अभिनेत्रीवर खेळला ममतांनी डाव

सामना ऑनलाईन । कोलकाता

लोकसभा 2019 निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक राज्यामध्ये उमेदवार जाहीर करण्यासाठी चढाओढ लागली आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवाराला टक्कर देणारा उमेदवार निवडण्याकडे विविध पक्षांचा कल दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील एक डाव खेळाला असून टॉलिवूडची हॉट अभिनंत्री नुसरत जहाँ हिला मैदानात उतरवले आहे. नुसरच्या खांद्यावर बंदुक ठेऊन भाजपला पराभव करण्याचे मनसुबे ममतांना आखले आहेत.

2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेमुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या होत्या. परंतु आता ही लाट ओसरल्याने भाजपला युपीमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. युपीचे नुकसान पश्चिम बंगालमध्ये भरून काढण्याची आशा भाजपने ठेवली आहे. परंतु येथे ममता बॅनर्जी त्यांच्याविरोधात शड्डू ठोकून बसल्या आहेत. भाजपच्या आशांवर पाणी फेरण्यासाठी ममतांना बशीरघाट विधानसभा क्षेत्रातून अभिनेत्री नुसरतला तिकीट दिले आहे. बशीरघाटमध्ये भाजपचा विजय पक्का मानला जात आहे, परंतु आता नुसरत मैदानात उतरल्याने तरुण आणि अल्पसंख्यांकीची मतं आपल्याकडे वळवण्याचा ममतांना डाव खेळला असल्याने येथे काँटे की टक्कर होण्याची शक्यता आहे.

nusrat-jahan

बंगली चित्रपट सृष्टीमधील नुसरत जहाँ लोकप्रीय चेहरा आहे. आपल्या छोट्याशा कारकीर्दीमध्ये तिने अनेक बड्या स्टारसोबत काम केले आहे. 2001 मध्ये तिने चित्रपटनगरीमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर तिने ‘बोलो दुर्गा माई की’, ‘हर हर ब्‍योमकेश’ आणि ‘जमाई 420’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे लाख फॉलोअर्स आहेत. राज्य सरकारच्या अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये तिने सहभाग घेतला होता.

पहिली प्रतिक्रिया
लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळाल्यानंतर नुसरत म्हणाली की, राजकीय कारकीर्दीची सुरुवात होणार असल्याने मला आनंद होत आहे, परंतु माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. अभिनय क्षेत्रातून राजकारणात येण्याबाबत आपण विचारही केला नव्हता असेही ती यावेळी म्हणाली. परंतु नुसरतला तिकीट मिळाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बलात्कार कांडात आले होते नाव
पार्क स्‍ट्रीट बलात्कार कांडामध्ये नुसरत जहाँचे नाव चर्चेत आले होते. बलात्कार कांडातील मुख्य आरोपी कादर खान याच्यासोबत तिचे संबंध होते. हे दोघे लग्नही करणार होते. या प्रकरणी पोलिसांनी नुसरत जहाँ हिची चौकशीही केली होती.

nusrat-jahan-1