भावासह 8 नातेवाईकांवर फेकलं अॅसिड, कारण काही समजेना

10

सामना ऑनलाईन । डेहराडून

उत्तराखंडच्या अलमोरामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपल्या भावासह कुटुंबातील आठ जणांवर अॅसिड हल्ला केला. या घटनेत तो हल्लेखोर देखील जखमी झाला आहे. मात्र या अॅसिड हल्ल्याचे कारण काय हे अद्याप कळलं नाही.

आपल्या भावावर आणि अन्य कुटुंबीयांवर अॅसिड हल्ला करणाऱ्या हल्लेखोराने अद्याप कारण सांगितलेले नाही. तसेच कुटुंबीयांना देखील या अचानक झालेल्या हल्ल्याने धक्का बसला आहे. आपल्या नातेवाईकांवर त्याने असा हल्ला का केला हे त्यांनीही उकलत नसल्याचे सांगण्यात आले. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोरावर देखील उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या