माझ्या मुलांच्या खऱ्या बापाचे नाव सांगा! चार लाख कमवा


सामना ऑनलाईन। लंडन

तब्बल एकवीस वर्षानंतर आपल्या तीन मुलांचा खरा जन्मदाता दुसराच कोणीतरी आहे हे कळल्यामुळे निराश झालेल्या इंग्लडमधील एका धनाढ्य व्यक्तीने त्या मुलांच्या खऱ्या बापाचा शोध सुरू केला आहे. यासाठी त्याने सोशल साईडवर एक पोस्ट टाकली आहे. त्यात माझ्या मुलांच्या खऱ्या बापाचे नाव सांगा आणि चार लाख कमवा असे आवाहनच त्याने केले आहे. रिचर्ड मैसन असे त्याचे नाव आहे.

इंग्लडमधील नॉर्थ वेल्समध्ये राहणारे रिचर्ड मैसन moneysupermarket.com चे सहसंस्थापक आहेत. रिचर्ड व त्यांची पहिली पत्नी कॅट जोन्स यांचा घटस्फोट झाला असून त्यांना तीन मुलंही आहेत. कॅटपासून विभक्त झाल्यानंतर रिचर्ड यांनी एमा जोन्स या तरुणी बरोबर दुसरा विवाह केला. आता एमा व रिचर्ड यांना मूल हवे असल्याने त्यांनी नुकत्याच काही चाचण्या केल्या. त्यात रिचर्ड कधीच पिता बनू शकत नाही असे समोर आल्याचे डॉक्टरांनी रिचर्डला सांगितल्याने त्याला धक्काच बसला. कारण त्याच्या पहिल्या पत्नीला तीन मूलं आहेत. यामुळे रिचर्डच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. त्यानंतर त्याने दोन्ही मुलांची डीएनए टेस्ट केली. पण तिसऱ्या मुलाने मात्र टेस्ट करण्यास नकार दिला. त्यात दोन्ही मुलं रिचर्डची नसल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कॅटला न्यायालयात याबद्दल विचारण्यात आलं. पण तिने तिचे एका बरोबर प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली पण त्याचे नाव सांगण्यास मात्र नकार दिला. यामुळे चिडलेल्या रिचर्डने मुलांच्या खऱ्या बापाचे नाव सांगणाऱ्यास चार लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.