सैन्याचे बनावट ओळखपत्र बनवून देणारा देवळालीतून ताब्यात

71

सामना ऑनलाईन । नाशिक

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे अशा देवळाली कॅम्प परिसरातून एका व्यक्तीला बनावट ओळखपत्र बनवून दिल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. या व्यक्तीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

सैन्यात काम करणाऱ्या एका व्यक्तीचे हरवलेले ओळखपत्र या व्यक्तीला सापडले. त्या आधारे सैन्याचे बनावट ओळखपत्र बनवण्यास त्याने सुरुवात केली. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या