अल्पवयीन मुलीला धमकी देऊन केले लग्न

75

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

येथे सातवीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला बदनामी करण्याची धमकी देऊन, तिच्या इच्छेविरुद्ध २८ वर्षीय तरुणाने लग्न केले. त्यामुळे त्याच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपावरून मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पतीसह सासऱ्यास पोलिसांनी अटक केली.
जालना येथील मंठा रोडवरील हिंद पेट्रोलपंपामागील अल्पवयीन मुलगी आई-वडिलांसोबत राहते. ती सातवीत असताना स्वामी शिवाजी पठारे (२८) याने तिला शाळेत जाऊन तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध लग्न करून बलात्कार केला. तसेच सासू-सासऱ्याने लग्नात हुंडा दिला नाही म्हणून तिचा छळ केला. पीडित मुलीचे आई व बहीण बोलण्यास गेली असता भायाने त्यांचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पती स्वामी शिवाजी पठारे, सासरा शिवाजी नामदेव पठारे, भाया उद्धव शिवाजी पठारे, सासू पार्वती शिवाजी पठारे सर्व सोमनाथ जळगाव, ता.जि. जालना यांच्याविरुद्ध मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या