व्हिडीओ : एक वर्षाच्या बाळाला बापानेच पाजली बिअर

सामना ऑनलाईन । कोलंबो

स्वत:च्या एक वर्षाच्या बाळाला त्याचे वडिल बिअर पाजत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या विचित्र बापाला अटक केली आहे. त्याच्यासोबत त्याच्या तीन मित्रांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीलंकेतील अनुराधापुरा जिल्ह्यातील मीगालेवा गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या एक वर्षाच्या मुलाला बिअर पाजली. त्यावेळी त्या व्यक्तीचे मित्र त्यांचा व्हिडीओ शूट करत होते. हा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकरणाची पोलिसांनी सु मोटो पद्धतीने दखल घेत त्या बापावर त्यांच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.