मोबाईलचा पासवर्ड दिला नाही म्हणून पत्नीने पतीला जिवंत जाळले

2

सामना ऑनलाईन । बाली

मोबाईलचा पासवर्ड न सांगितल्याने एका पत्नीने पतीला जिवंत जाळल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यात 70 टक्के होरपळलेल्या त्या दुर्दैवी पतीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे.

इंडोनेशियातील पूर्व लोंबाक रेजेन्सी भागात 26 वर्षीय डेडी पुरनामा हा त्याची पत्नी इल्हाम काहयानी (25) सोबत राहत होता. दोन दिवसांपूर्वी डेडी हा त्याच्या घराचे छताचे काही काम करत होता. त्यावेळी इल्हामने त्याला त्याच्या मोबाईलचा पासवर्ड विचारला मात्र डेडीने पासवर्ड सांगण्यास नकार दिला. त्यावरून त्या दोघांमध्ये भांडण झाले. डेडी छतावरून खाली उतरल्यानंतर त्याने इल्हामच्या कानशिलात लगावली. त्यामुळे संतापलेल्या इल्हामने जवळच ठेवलेल्या कॅनमधील पेट्रोल डेडीच्या अंगावर ओतले व त्याला पेटवून दिले. डेडीच्या शेजारी राहणाऱ्या ओजीने त्याच्या घरातून आगीच्या ज्वाळा दिसल्याने तेथे धाव घेतली. त्याने तत्काळ डेडीच्या अंगाला लागलेली आग विझवली व त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन दिवसांच्या उपचारानंतर अखेर डेडीची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी इल्हामला अटक केली असून तिने तिचा गुन्हा कबूल केला आहे.