जळती सिगारेट गाडीबाहेर फेकल्याने एकाला 39 हजारांचा दंड

9

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

गाडीतून सिगारेट पीत जाणारे अनेकजण जळती सिगारेट गाडीबाहेर फेकत असतात. मात्र अशा प्रकारे जळती सिगारेट गाडीबाहेर फेकणे एका महाशयांना चांगलेच महाग पडले आहे. त्या व्यक्तीला अग्निशमन दलाने व वाहतूक विभागाने तब्बल 39 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अमेरिकेतील विक्टोरिया शहरात ही घटना घडली आहे.

विक्टोरिया शहरातील रस्त्यावरील एका कारमधूल जळती सिगारेट बाहेर फेकल्याचे वाहतूक पोलिसांनी बघितले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ त्या गाडीचा पाठलाग करत त्या गाडीच्या चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या चालकाला पोलीस व अग्निशमन दलाने मिळून 39 हजारांचा दंड ठोठावला. या दंडाच्या पावतीचा फोटो वाहतूक पोलीस विभागाचे प्रमुख डेल मानेक यांनी ट्विटरवर टाकले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या