पत्नी व मुलीला जाळणाऱ्या नराधमास जन्मठेप

jail-crime

सामना प्रतिनिधी। नांदेड

पत्नी व मुलीला जाळून दुहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपीला प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच तसेच दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

शहरातील हडको येथे १४ एप्रिल २०१५ रोजी रतन चांदू ढवळे याने सासू वारंवार घरी का येते असे म्हणत पत्नी गंगासागर हिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच गंगासागर हिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीनंतर आंबेडकर जयंती मिरवणुकीत येण्यास नकार दिल्याने रतन ढवळे याने गंगासागर व दहा वर्षाची मुलगी चैतन्या हिच्या अंगावर रॉकेल ओतून दोघींना जिवंत पेटवून दिले. यात दोघींचा मृत्यू झाला. या दोघींनी मृत्यूपूर्व जबाब नोंदविले होते. या प्रकरणी सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यात रतन ढवळे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम मरांडे यांनी करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असता न्यायालयाने आरोपी रतन ढवळे यास दुहेरी जन्मठेपेची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड सुनावला. या प्रकरणात एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले.