अश्लील चाळे, जबरदस्ती करणाऱ्याला 3 वर्षांची शिक्षा

241

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

तरुणी घरात एकटी असल्याचा फायदा घेउन तिच्याशी अश्लील चाळे आणि जबरदस्ती केल्याच्या आरोपावरुन एका व्यक्तीला न्यायालयाने 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 30 हजार रुपये दंड ठोठावला आहे. सन्मान सादिक मुजावर (24) असे या आरोपीचे नाव आहे.

ही घटना 12 फेब्रूवारी 2012 रोजी झाली. सन्मान मुजावर याने पिडीत तरुणी एकटी घरात असताना तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्याशी अश्लील चाळे करुन तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सन्मान मुजावर याने याबाबत कोणाला काही सांगितल्यास तुम्हाला आणि तुमच्या मुलीला ठार मारु अशी धमकी पिडीत तरुणीच्या वडीलांना दिली होती.

शहर पोलीस ठाण्यात पोलीसांनी कलम 451, 354, 427, 504, 506 व पॉस्को (8) अन्वये गुन्हा दाखल केला होता. आज जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्फ विशेष न्यायालय एल.डी.बीले यांच्या सत्र न्यायालयात खटल्याचा निकाल झाला. सरकारी पक्षातर्फे ॲङ.विनय गांधी यांनी काम पाहीले. या खटल्यात 10 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षातर्फे झालेला युक्तीवाद ग्राहय मानून कोर्टाने आरोपीला शिक्षा व दंड ठोठावला.

आपली प्रतिक्रिया द्या