अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती केली म्हणून केली शेजाऱ्याची हत्या

murder

सामना ऑनलाईन । मुंबई

अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती केली म्हणून एका व्यक्तीने त्याच्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या झाली ती व्यक्ती समलैंगिक होती व त्याने अनैसर्गिक संभोगासाठी जबरदस्ती केल्यानेच त्याची हत्या केल्याचा दावा आरोपीने न्यायालयात केला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाने आरोपीच्या बाजूने निकाल देत त्याची कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी मान्य केली आहे.

चोरीचा आरोप करत अल्पवयीनांवर एकमेकांशी संभोगाची जबरदस्ती

२९ नोव्हेंबर २०११ रोजी नागपाडा येथील एका कसायाच्या घरातून आरडा ओरडा ऐकू आल्याने शेजारी राहणारा एक भंगारवाला धावत त्याच्या घरी गेला. त्यावेळी तो कसाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तर त्याचा मारेकरी तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यावेळी त्या शेजाऱ्याने मारेकऱ्याला परत घरात ढकलले व पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

पुरूषांवरील बलात्कारविरोधी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

याप्रकरणी आरोपीचे वकील पायोशी रॉय आणि युग चौधरी यांनी न्यायालयात युक्तीवाद करताना त्यांच्या अशिलावर अनैसर्गिक संभोगासाठी जबरदस्ती केल्याने त्यांनी स्वत:च्या बचावासाठी त्या व्यक्तीची हत्या केल्याचा दावा केला. त्यांचा हा दावा मान्य करत न्यायालयाने आरोपीला सहा वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी हा गेल्या सात वर्षांपासून तुरुंगात कैद असल्याने उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भुषण गवई आणि सारंग कोतवाल यांनी त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत.