डोक्यावर पाण्याची बाटली पडली म्हणून तिघांवर जीवघेणा हल्ला, महिलेचा मृत्यू

8
murder

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

डोक्यावर शाळकरी मुलीच्या हातातली पाण्याची बाटली पडली या शुल्लक कारणावरून मोहम्मद आझाद नावाच्या आरोपीने एकाच कुटुंबातील तिघांवर जीवघेणा हल्ला केला. बकरा कापायच्या सुऱ्याने केलेल्या या हल्ल्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला असून तिचा नवरा आणि मुलगा गंभीररित्या जखमी झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी सुनीता मुलीसोबत घरी परत येत होती. मुलीच्या हातातील पाण्याची बाटली चुकून आझादच्या डोक्यावर पडली. याचा राग आल्याने त्याने सुनीताशी भांडायला सुरुवात केली. हे भांडण थोड्यावेळाने थांबलं मात्र बुधवारी रात्री आझादने सुनीताच्या घरी जाऊन पुन्हा वाद उकरून काढला. त्याने हातातील सुऱ्याने तिच्यावर वार केले, तिच्या मदतीसाठी आलेल्या नवऱ्यावर म्हणजेच विरूवर आणि मुलावर म्हणजेच आकाशवरही वार केले. हल्ल्यामध्ये जबर जखमी झालेल्या सुनीताचा अतिरक्तस्त्रावामुळे जागीच मृत्यू झाला तर विरू आणि आकाश या दोघांची प्रकृती गंभीर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या