हेडफोनने घेतला तरुणाचा जीव, भरधाव ‘राजधानी’ने शरीराचे तुकडे केले

सामना ऑनलाईन, नागपूर

गाणं ऐकण्याची हौस जीवावर बेतू शकते याचं उदाहरण नागपुरात बघायला मिळालंय. हेडफोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणाऱ्या आकाश भोयर नावाच्या तरुणाचा मृत्यू झालाय.  आकाशने बैल शेतामध्ये चरण्यासाठी नेले होते. बैल चरत असताना तो रेल्वे ट्रॅकवर गाणी ऐकत बसला होता. मागून राजधानी एक्सप्रेस वेगात येत होती. या गाडीच्या मोटरमनने हॉर्न देखील वाजवला, मात्र कानात हेडफोन असल्याने आकाशला तो ऐकायला आला नाही. या एक्सप्रेसने आकाशच्या शरीराचे दोन तुकडे केले, त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आकाशच्या अपघाती मृत्यूबद्दल कळमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.