लग्नाळू माणसाची गोष्ट; १२० बायका आणि २८ मुलं

सामना ऑनलाईन । बँकॉक

लग्न हा व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. कारण तो आयुष्यात एकदाच येतो. मात्र थायलंडमधील व्यक्तीच्या ५८ वर्षाच्या आयुष्यात १२० वेळा लग्न केलं आहे. अर्थात थाडलंडमधील एका व्यक्तीच्या १२० बायका असून त्याला २८ मुलं आहे. नवल म्हणजे त्याच्या सर्व बायकांना एकमेकींबद्दल सर्वकाही माहीत आहे. विशेष म्हणजे थायंलडमध्ये बहुविवाहावर प्रतिबंध आहे. त्याने बेकायदेशीरपणे १०० पेक्षा जास्त लग्न केल्याची कबुली दिली. तंबन प्रॅजर्ट असं या व्यक्तीचं नाव असून तो थायलंडच्या नकोन नायोक प्रांताच्या फ्रॉमनी जिल्हाचा प्रमुख आहे.

तंबन प्रॅजर्टचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय देखील आहे. मीडियाने तंबनला त्यांच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी माझ्या १२० बायका असून एकून २८ मुलं आहेत. मी जेव्हा १७ वर्षाचा होतो माझं पहिलं लग्न झालं होती, आम्हाला तीन मुलं झाली. त्यानंतर थायलंडच्या मीडिया दिलेल्या बातम्यांनुसार तंबनने जेव्हा कन्स्ट्रक्शन बिझनेस सुरू केला होता तेव्हापासून तो जेथे घरं बांधायचा, तेथे एका नव्या पत्नीला बरोबर घेऊन जायचा. जिथे मी घर बांधतो तेथे मला एक पत्नी मिळते. त्या सगळ्यांवर माझ प्रेम आहेच पण त्याही माझ्यावर प्रेम करतात, असं तंबनने सांगितलं.

तंबन नवीन लग्न करताना त्या लग्नाबाबत आधीच्या सगळ्या पत्नींना सांगत असतो. ‘माझ्या १२० पत्नींना माझ्या या वागण्याबद्दल काहीही अडचण नाही. त्यांना याबद्दल वादही केला नाही. कुठल्याही मुलीशी लग्न करण्याआधी मी तीच्या कुटुंबियांची पूर्ण सहमती घेऊनच लग्न करतो, असं त्याने सांगितलं आहे. १२० बायका आणि २८ मुलांची देखभाल करणं कठीण नसल्याचंही तंबनने सांगितलं आहे.