दात किडक्याने मित्राच्या मुलीशी केलं लग्न, स्थानिकांनी हाकलून दिलं

2
फोटो सौजन्य- HotSpot Media

सामना ऑनलाईन, वेल्स

ऑस्ट्रेलियामध्ये ४७ वर्षांच्या अँडी नावाच्या माणसाने त्याच्या मित्राच्या १६ वर्षांच्या मुलीशी म्हणजेच बेथ टेलफोर्डशी लग्न केलं आहे.  अँडी हा बस ड्रायव्हर असून त्याचे दात गुटखा खाणाऱ्या माणसासारखे किडलेले आणि वाकडे तिकडे आहेत, त्यामुळे त्याला दात किडक्या म्हणूनही ओळखलं जातं. बेथशी लग्न केल्यानंतर अँडी हा लहान मुलांचं लैंगिक शोषण करणारा आहे असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आणि वेल्समधून या दोघांना स्थानिकांनी हाकलून दिले. एका Age Gap love (एज गॅप लव्ह) या टीव्ही कार्यक्रमासाठी जवळपास २ वर्षांनी हे जोडपं वेल्समध्ये परत आलंय. बेथने शहरात परत आल्यानंतर तिच्या आईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ती अजूनही या दोघांवर नाराज असून दोघांमधील नातं ती स्वीकारण्यास तयार नाहीये.

अँडी आणि बेथ यांच्यात २८ वर्षांचा फरक आहे. मला अँडी हा योग्य साथीदार वाटल्याने तो माझ्या वडिलांचा मित्र आहे, तो माझ्यापेक्षा वयाने मोठा आहे असा विचार कधीच मनात आला नाही. अँडी आणि बेथ यांना दोन मुलं देखील झाली असून मोठा मुलगा हा दोन वर्षांचा आहे तर लहान मुलगा हा दीड वर्षांचा आहे. या दोघांना वेल्सला पुन्हा जाऊन रहावं असं वाटतंय, मात्र विरोधामुळे ते आजपर्यंत ही हिम्मत करू शकलेले नाहीत