बाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी त्याने खर्च केले 13 लाख रुपये

सामना ऑनलाईन। टोकियो

जपानमध्ये एका 35 वर्षीय तरुणाने गाणाऱ्या बाहुलीबरोबर लग्न करण्यासाठी एक दोन नव्हे तर चक्क 13 लाख रुपये खर्च केले आहेत. अकिहिको कोन्डो असे त्याचे नाव आहे. ही बाहुली गाणंही गाते व गप्पाही मारते. ही बाहुली कापडाची आहे. ती 16 वर्षाची आहे. अकिहिको याने तिचे नाव हसुने मिकू असे ठेवले आहे.

टोकियोमध्ये हा लग्नसोहळा नुकताच संपन्न झाला. पण या लग्नास अकिहिकोच्या आईचा व इतर कुटुंबीयांचा विरोध होता. यामुळे निवडक 40 पाहुण्यांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले. मीकू ही बाहुली असली तरी माझे तिच्यावर मनापासून प्रेम असून मी तिला कधीही फसवणार नाही असे यावेळी अकिहिकोने जाहीर केले. यापुढे मी सामान्य विवाहित पुरुषाप्रमाणे आयुष्य जगणार असल्याचे अकिहिको म्हटले आहे. विशेष म्हणजे जपानमधील तरुण लग्नात फार रुची दाखवत नाहीत. त्यामुळे येथे बॅचलर तरुणांची संख्या सर्वाधिक आहे.