बलात्कार करून नवऱ्यानेच केला बायकोचा खून

76

सामना ऑनलाईन । ठाणे

बायकोच्या अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून नवऱ्याने पत्नीचा बलात्कार करून खून केल्याची घटना ठाण्यातील बिरवाडी गावात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेचा पती संतोष शेळके याला अटक केली आहे.

संतोष हा बेरोजगार असून त्याला दारूचे व्यसन होते. त्याची पत्नी सुनीता ही घर चालविण्यासाठी पिठाच्या गिरणीवर काम करायची. संतोषला सुनीताचे गिरणीवरील कामगारासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यावरून त्यांच्यात वाद होत होते. सोमवारी रात्री सुनीता कामावरून परतत असताना संतोषने तिचे अपहरण केले व त्यानंतर तिला घेऊन तो निर्जन स्थळी गेला. तिथे तिच्यावर बलात्कार केल्यानंतर त्याने तिची ओढणीने गळा आवळून हत्या केली. सुनीतावर बलात्कार झालाय हे दाखविण्यासाठी संतोषने काचेच्या तुकड्याने तिच्या गुप्तांगावर वार केले.

सुनीताची हत्या करून संतोष काहीही न केल्याच्या अविर्भावात घरी परतला. त्यानंतर उशीरा रात्री सुनीता घरी परतली नसल्याचे त्याने शेजारच्यांना सांगितले व त्यांच्या मदतीने त्या परिसरात शोधाशोध करायला सुरुवात केली तेव्हा झाडीत सुनीताचा मृतदेह आढळून आला. शेजारच्यांनी याविषयी पोलिसांनी कळविल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. मात्र बायकोच्या हत्येच्या दुखापेक्षा संतोष तिच्या हत्येच्या तपासात जास्त रस दाखवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी संतोषची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या गुन्हा कबूल केला.

आपली प्रतिक्रिया द्या