पब्जीसाठी त्याने गरोदर बायकोला सोडले

16
pubg-new


सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या जगभरात पब्जी या गेमने धुमाकूळ घातला आहे. अनेक तरुण मुलं या गेमच्या आहारी गेली आहेत. काही दिवसांपूर्वीच या गेमसाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यामुळे या गेमवर बंदी आणण्याची देखील मागणी केली जात असतानाच या गेममुळे एका व्यक्तीने त्याच्या गरोदर बायकोला सोडल्याचे समोर आले आहे. याबाबत अद्याप फारशी माहिती तसेच त्या माणसाची ओळख समोर आलेली नाही. मात्र हे वृत्त धक्कादायक असून त्यामुळे पुन्हा एकदा पब्जीवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार सध्या फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल झाली असू त्यात पब्जीमुळे एका व्यक्तीने त्याच्या कुटुंबाला व गरोदर बायकोला सोडल्याचे सांगितले आहेत. पब्जीचे व्यसन लागलेला हा तरुण त्याच्या कुटुंबीयांना बिलकूल वेळ देत नव्हता. तसेच पब्जी खेळण्यासाठी तो रात्ररात्रभर जागा राहायचा त्यामुळे त्याच्या बायकोसोबत त्याचे वाद व्हायचे. त्यामुळे पब्जी खेळण्यासाठी त्याने बायको व कुटुंबाला सोडण्याचा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी पबजी खेळण्यासाठी महागडा फोन घेऊन दिला नाही म्हणून कुर्ला येथील नदीम शेख या 19 वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. नदीमने किचनमध्ये ओढणीचा फास घेऊन आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या