आवडीची भाजी केली नाही म्हणून नवऱ्याची आत्महत्या!

सामना ऑनलाईन । कोलकाता

बायकोने आवडीची भाजी बनवली नाही म्हणून नवऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जयपूरच्या कृष्णविहार परिसरातील ही घटना घडली आहे. विशाल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट मिळाली नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल आपल्या पत्नीसोबत कृष्णनगर येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. शुक्रवारी रात्री विशालच्या पत्नीने जेवणात भेंडीची भाजी बनवली होती. मात्र भेंडीची भाजी विशालला आवडत नव्हती. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झालं आणि त्याच रात्री विशालने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. विशालच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, विशाल बेरोजगार होता. तसेच त्याला अनेक व्यसनं होती.