अब्बूने रडता रडता आम्हाला रेल्वेतून फेकून दिलं !

सामना ऑनलाईन, सीतापूर

बेटी बचाव बेटी पढावच्या मोठमोठ्या घोषणा दिल्या जात असताना मुलींवरचे अन्याय, अत्याचार थांबलेले नाहीत. बिहारमध्ये एका बापेने झोपेतून उठवत तीन मुलींना भरधाव रेल्वेतून खाली फेकून दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका मुलीचा मृत्यू झाला असून इतर दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. अमृतसरहून सहरसा (बिहार)ला जाणाऱ्या जनसेवा एक्स्प्रेसमध्ये हा प्रकार घडला आहे. मंगळवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली असावी असा पोलिसांनी अंदाज वर्तवला आहे.

अल्बूतन आणि सलीना खातून अशी जखमी झालेल्या मुलींची नावे आहेत तर जी मुलगी मृत्यूमुखी पडली आहे तिचं मुन्नी खातून असं आहे. ज्या निर्दयी बापाने या तिघींना फेकलं त्याचं नाव इद्दू खातून असल्याचं कळालं आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

या मुली तिच्या वडीलांसह आणि काकांसह लुधियाना इथून गाडीमध्ये बसल्या होत्या. हे कुटुंब मोतीहारी,बिहारचं राहणार आहे. पोलिसांनी जेव्हा अल्बतूनकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली की तिचा काका देखील या तिघींनी फेकून देताना तिथे होता. भेदरलेल्या अल्बतूनने तिला फेकून देण्यापूर्वी वडीलांना विचारलं की तुम्ही आम्हाला का फेकताय ? तेव्हा वडील नुसते रडत होते असं सांगितलंय.