अपहरणाचे नाटक गळ्याशी, हेराफेरीमधला प्रसंग वास्तवात

सामना ऑनलाईन, नागपूर

नागपुरात एक अत्यंत गुंतागुंतीची आणि हादरवून टाकणारी घटना घडली आहे. शनिवारी लिहीगावात सुजल वासनिक नावाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. त्याच्या घरच्यांना फोन आला आणि १० लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणीचे पैसे घेऊन अपहरणकर्त्याला देण्याचं सुजलच्या पालकांनी ठरवलं. अपहरणकर्त्याने सांगितल्याप्रमाणे त्यांनी पैसे ठेवले हे पैसे कोण नेतो हे पाहण्यासाठी यातला एक जण दबा धरून बसला होता. त्याने बघितलं की रामदास मडावीने हे पैसे उचलले आहेत. ग्रामस्थांच्या मदतीने सुजलच्या नातेवाईकांनी  रामदासला पकडला आणि त्याला हिसका दाखवला. या घटनेचा हा एक्स्लुझिव्ह व्हिडिओ पाहा

रामदासला सुजल बेपत्ता झाल्याचं कळालं होतं, पैसे मिळतील या आशेने अपहरण केलं नसतानाही खंडणीची मागणी केली. बेरोजगार असलेल्या रामदासला झटपट पैसा हवा होता. मात्र यामुळे तो पकडला गेला. धक्कादायक बाब ही आहे की त्याने पोलीस कोठडीमध्ये स्वत:चा गळा कापून घेण्याचा प्रयत्न केलाय, ज्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कामटीतील चौधरी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहे. हे सगळं घडत असताना अजूनही सुजलचा पत्ता लागला नाहीये, त्याचं अपहण कोणी केलंय हे कळू शकलं नाहीये.