200 रुपये उधारी घेऊन घेतली लॉटरीचे तिकीट, जिंकला दीड कोटी रुपये

60

सामना ऑनलाईन । चंदीगढ

देनेवाला जब भी देता छप्पर फाडके असे सुप्रसिद्ध गीत आहे. त्याचा प्रत्यय चंदीगढच्या एका गरीब मजूराला आला आहे. मनोज कुमार या गरीब मजुराला तब्बल दीड कोटीची लॉटरी लागली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे तिकीट घेण्यासाठी त्याने उधारीवर मित्राकडून २०० रुपये घेतले होते.

पंजाब राज्याने २९ ऑगस्ट रोजी राखी बंपर लॉटरीची घोषणा केली होती. या बंपर लॉटरीची सोडत घोषणा लुधियानामध्ये झाली. विजेत्या लॉटरी तिकीटाचा क्रमांक जाहीर झाल्यावर आपण लॉटरी जिंकलो आहोत यावर मनोज यांचा विश्वासच बसला नाही. मनोज यांनी लॉटरी ऑफ पंजाबच्या संचालकांची भेट घेऊन लॉटरी जिंकल्याचे सांगितले, संचालकांनीही बक्षीसाची रक्कम लवकरच मिळेल असे आश्वासन दिले आहे.

एवढ्या मोठ्या रकमेची लॉटरी आपण जिंकू असे स्वप्नातही कधी वाटले नाही अशी प्रतिक्रिया मनोजने दिली. तसेच या पैश्यांमुळे आपले अनेक प्रश्न मार्गी लागतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या