कुडाळात मंगळागौर कार्यक्रम उत्साहात

सामना प्रतिनिधी । कुडाळ

कुडाळ नगरपंचायतीच्या नाबरवाडी प्रभागाच्या शिवसेनेच्या नगरसेविका श्रेया शेखर गवंडे व ‘नारी घे भरारी ग्रुप’, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळागौर कार्यक्रम नुकताच नाबरवाडी कुडाळ येथे घेण्यात आला. महिलांनी या कार्यक्रमाला मोठी उपस्थिती दर्शविली.

सर्वप्रथम मंगळागौरीला आवाहन करण्यात आले व नंतर पारंपारीक फुगड्या सादर करण्यात आल्या. सर्व महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत फुगड्यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला माजी सरपंच सौ. समता परब यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. ‘नारी घे भरारी ग्रुप’च्या सौ. राधीका सप्रे, सौ. नेहा मडकईकर, सौ. रंजना कांबळी व सौ. वैष्णवी खानोलकर यांचे यावेळी सहकार्य लाभले.