आंब्याला अजुनही फुटेना मोहर, दुष्काळामुळे गोडवा कमी होणार


सामना प्रतिनिधी । हडोळती

अत्यल्प पाऊस, अप्रतिकूल हवामान, तीव्र दुष्काळ, गेल्या पंधरवाड्यात पडलेले दाट धुके यामुळे अद्याप गावरान आंब्याला मोहर फुटलेला नाही. दुष्काळाचा फटका आंब्याला बसणार असून गोडवा कमी होण्याची चिन्हे आहेत.

जानेवारी महिना सुरू होऊन आठवडा आला तरी मोहर न फुटल्याने शेतकरी चिंतेत आहेत. डिसेंबर महिन्याच्या पहील्या आठवड्यापासून मोहर फुटण्यास सुरुवात होते. आता जानेवारी सुरू होऊन आठवडा लोटला तरीही जून्या गावरान झाडांना मोहर नाही. त्यामुळे मोहर मोहरण्याची आशा धुसर होत चालली आहे.