मंजिरी झळकणार मोठ्या पडद्यावर

17

सामना ऑनलाईन । मुंबई

दिल दोस्ती दुनियादारी या लोकप्रिय मालिकेतील ‘निशा’ आठवतेय का? राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत असलेली ही निशा, म्हणजेच मंजिरी पुपाला लवकरच मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित ’पार्टी’ सिनेमात ती ‘दिपाली’ नामक एका बिनधास्त मुलीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. यापूर्वी मंजिरीने हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केले असून, ‘ग्रहण’ मालिकांद्वारे ती सध्या घराघरात पोहोचत आहे. मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा ७ सप्टेंबर प्रदर्शित होत आहे.  नवविधा प्रॉडक्शन प्रस्तुत आणि ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रॉडक्शन्स निर्मित ‘पार्टी’ या सिनेमात तिच्यासोबत सुव्रत जोशी, अक्षय टांकसाळे, स्तवन शिंदे, रोहित हळदीकर आणि प्राजक्ता माळी हे कलाकारदेखील झळकणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या