बाबाला पंजाब पोलीस पळवणार होते, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा खुलासा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

बाबा राम रहीमच्या बाबतीत रोज नवनवे खुलासे होतायत. यामध्ये आता भर पडलीय ती हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या खुलाशाची. त्यांनी खुलासा केलाय की न्यायालयाने निकाल देताच बाबाला तिथून पळवण्याचा काही पोलिसांनी कट रचला होता. खट्टर यांचं म्हणणं आहे की बाबालवा झेड सिक्युरिटी देण्यात आली होती.  त्यात ८ जण हे पंजाब पोलिसांचे कर्मचारी होते. हरियाणाच्या पोलिसांकडे एक रिव्हॉल्वहर असते तर पंजाब पोलिसांकडे २ रिव्हॉल्व्हर होत्या असा दावा खट्टर यांनी केला आहे.

पंजाब पोलिसांचे कर्मचारी तिथे कुठल्या अधिकारात पाठवण्यात आले ते माहिती नाही मात्र त्यांचा कट हरियाणा पोलीस, निमलष्करी दल यांनी मिळून हाणून पाडल्याचा दावाही खट्टर यांनी केला आहे. बाबाने त्याच्या समर्थकांवर पंचकुला न्यायालयात पोहोचण्यासाठी जबाव टाकला होता आणि यातील बहुतांश समर्थक हे पंजाब मधून आले होते असंही खट्टर यांचं म्हणणं आहे. हरियाणामध्ये भाजपाचं सरकार आहे तर पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. या खुलाशामुळे खट्टर आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यात येणाऱ्या काळात जबरदस्त शाब्दीक युद्द पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.