अमित शहांच्या भूमिकेत ‘कल्लू मामा’च फिट, नेटकऱ्यांची मागणी

3

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची लाट आली आहे. आता दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ असे या चित्रपटाचे नाव असून यात विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत दिसणार असून प्रसिद्ध अभिनेते मनोज जोशी यांची अमित शहांच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे.

PM Modi पंतप्रधान मोदींच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

अमित शहांच्या भूमिकेसाठी मनोज जोशी यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नेटकऱ्यांनी मात्र दुसऱ्या अभिनेत्याचे नाव पुढे केले आहे. अमित शहांच्या भूमिकेत ‘कल्लू मामा’ अर्थात सौरभ शुक्लाच योग्य असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

अभिनेते सौरभ शुक्ला यांनी राम गोपाल वर्माच्या ‘सत्या’ चित्रपटात साकारलेली ‘कल्लू मामा’ची भूमिका प्रचंड गाजली होती. यानंतर त्यांनी विविध भूमिका साकारत वाहवा मिळवली. ‘जॉली एलएलबी 2’मध्ये देखील शुक्ला यांच्या न्यायाधीशाच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. शुक्लांचा चेहला अमित शहांच्या चेहऱ्याशी मिळता-जुळता असल्याने तेच या भूमिकेत फिट बसत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.