उत्तर-पूर्व मतदारसंघात मनोज कोटक यांनी संधीचे सोने केले

14

सामना ऑनलाईन । मुंबई

उत्तर-पूर्व मुंबई (ईशान्य मुंबई) मतदारसंघातून भाजपने यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याऐवजी महापालिकेतील गटनेते, नगरसेवक मनोज कोटक यांच्या गळय़ात उमेदवारीची माळ घातली. या संधीचे कोटक यांनी सोने केले. कोटक यांनी महाआघाडीचे संजय दिना पाटील यांचा तब्बल 3 लाख 46 हजार 024 लाखांच्या मताधिक्याने पराभव केला. 5 लाख 13 हजार 579 लाख मते घेऊन त्यांनी दणदणीत विजय मिळवला.

या मतदारसंघात महायुतीने केलेल्या कामांचीच ही पोचपावती आहे. मतदारांनी दिलेली संधी मी वाया घालवणार नाही. देवनार डंपिंग ग्राऊंड असो किंवा इतर प्रश्न, झपाटून कामाला लागेन अशी प्रतिक्रिया मनोज कोटक यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. या मतदारसंघात आमदार सुनील राऊत यांनी विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील संक्रमण शिबिरातील रहिवाशांच्या घरांचा प्रश्न सोडवला. भांडुपचे आमदार अशोक पाटील यांच्या विकासनिधीतून तसेच नगरसेवकांच्या विकास निधीतूनही अनेक विकासकामे करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या