समलैंगिकांना ‘या’ देशांमध्ये मिळते मृत्युदंडाची शिक्षा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा नाही, असे स्पष्ट करत आज सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक निर्णय दिला आहे. त्यामुळे आजपासून समलैंगिक संबंध हिंदुस्थानात कायदेशीर झाले आहे. मात्र अद्याप अनेक असे देश आहेत जिथे समलैंगिक संबंध हा कायद्याने गुन्हा असून असे संबंध असणाऱ्यांना शिक्षा दिली जाते. यात काही देशांत चाबकाचे फटके दिले जातात तर काही देशात चक्क मृत्युदंडाची शिक्षा आहे.

सुदान, इराण, सौदी अरब, येमेन, सोमालिया, नायजेरिया या देशांमध्ये समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते. काही देशांत फासावर लटकवले जाते तर काही देशांतील खेड्यापाड्यात आजही समलैंगिकांनाा दगडाने ठेचून मारले जाते. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि कतार या देशात देखील समलैंगिकांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. तर इंडोनेशिया, कझाकस्तान, टोगो अशा काही देशांमध्ये समलैंगिकांना भर रस्त्यात चाबकाचे फटके दिले जातात.

या देशात समलैंगिक संबंध आहेत कायदेशीर
अमेरिका, इंग्लंड, रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, स्पेन, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, स्वीडन, आइसलँड, पोर्तुगल, अर्जेंटीना, डेन्मार्क, उरुग्वे, न्युझिलंड, फ्रांस, ब्राझील, इंग्लंड, स्कॉटलँड, फिनलैंड, आयरलँड, ग्रीनलँड, कोलंबिया, जर्मनी, माल्टा या देशांमध्ये समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता आहे.