बहुतेक हिंदुस्थानी मोबाइलधारक मोबाइलवर घालवतात दिवसातले ४ तास

37

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

स्मार्टफोनवर सक्रीय असलेले हिंदुस्थानातले मोबाइलधारक सरासरी दिवसातले ४ तास विविध अॅप वापरण्यावर खर्ची घालतात. दर दिवसाचे कामाचे ८ तास धरले तर अर्धा वेळ हिंदुस्थानी नागरिक मोबाइलवर वेगवेगळ्या अॅपचा वापर करण्यात गुंतले असतात. उपलब्ध आकडेवारीनुसार, मे २०१७ मध्ये हिंदुस्थानातले मोबाइलधारक अँड्रॉइड अॅप वापरणाऱ्या अव्वल पाच देशांच्या यादीत होते. अॅप अॅनी या कंपनीने ही माहिती दिली आहे.

दक्षिण कोरिया, मेक्सिको, ब्राझिल आणि जपानमधील स्मार्टफोनधारक विविध अँड्रॉइड अॅप वापरणाऱ्यावर दिवसातले पाच तास खर्ची घालतात. त्यानंतर अॅपचा करण्यात हिंदुस्थानचा नंबर लागतो. हिंदुस्थानात जे मोबाइलधारक स्मार्टफोनवर मर्यादीत स्वरुपात अॅक्टिव्ह असतात ते सुद्धा दिवसातला किमान दीड तास मोबाइल वापरण्यात मग्न असतात. जे मोबाइलधारक थोडे जास्त प्रमाणात अॅक्टिव्ह असतात ते अॅप वापरण्यासाठी अडीच तास खर्ची घालतात.

अॅप अॅनी कंपनीने केलेल्या अभ्यासानुसार, खरेदी (शॉपिंग), पर्यटन (ट्रॅव्हल) आणि गेम्स यांच्याशी संबंधित अॅपना स्मार्टफोनधारकांची सर्वाधिक पसंती आहे. एक हिंदुस्थानी महिन्याला दीड तास अॅपद्वारे शॉपिंग करत असतो, असे अॅप अॅनी कंपनीने अभ्यासाअंती सांगितले. शॉपिंग अॅपचा वापर करणाऱ्यांमध्ये दक्षिण कोरियातले स्मार्टफोनधारक अव्वल स्थानी हिंदुस्थानी दुसऱ्या आणि ब्राझिलचे मोबाइलधारक तिसऱ्या स्थानी आहेत. ब्राझिलचे नागरिक अॅपद्वारे शॉपिंगसाठी सरासरी ४५ मिनिटे खर्ची घालतात.

आपली प्रतिक्रिया द्या