कर्जतमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत

47


सामना ऑनलाईन । कर्जत

राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून राष्ट्रवादीचे कर्जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी आज असंख्य कार्यकत्र्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाती भगवा झेंडा देऊन त्यांचे स्वागत केले.

सुरेश टोकरे यांनी आयोजित केलेल्या कबड्डी लिगचे उद्घाटन शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर बारणे यांच्यासह टोकरे व त्यांचे कार्यकर्ते मातोश्री निवासस्थानी दाखल झाले. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मोरे, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, मतदारसंघ संघटक संतोष भोईर, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, संघटक राजेश जाधव, उपतालुकाप्रमुख दशरथ भगत, नेरळ शहरप्रमुख रोहिदास मोरे, उपशहरप्रमुख बंडू क्षीरसागर उपस्थित होते. टोकरे यांच्यासह अरुण कराळे, शरद हजारे, पंचायत समितीचे माजी सभापती अनंत धुळे, सुनील रसाळ, सुनील बांगारे, भगवान कराळे, शिवराम बधे यांच्यासह राष्ट्रवादीच्या असंख्य कार्यकत्र्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

आपली प्रतिक्रिया द्या