फुलंब्रीतील शेकडो युवक युवासेनेत

108

सामना प्रतिनिधी, फुलंब्री

फुलंब्री शहरातील विविध पक्षांतील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना, युवासेनेत जाहीर प्रवेश केला. शहरातील विविध पक्षांतील उपजिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना, युवासेनेत प्रवेश केला. यात सुश्मेश राजू प्रधान, जिल्हा उपाध्यक्ष अमित वाहूळ, बाबासाहेब गंगावणे, बाळू गंगावणे यांच्यासह शेकडो कार्यकत्र्यांचा समावेश आहे. प्रवेश घेतलेल्यांचे शिवबंधन बांधून स्वागत केले .

यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर म्हणाले की, राज्यात शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेतकऱ्यांचा आणि जनतेचा विश्वास शिवसेनेवरच आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून स्वबळावर लढविणार आहे. शिवसेना नेते तथा खासदार चंद्रकांत खैरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. १९८७ ला फुलंब्रीत शिवसेना शाखेची स्थापना माझ्या उपस्थीतीत झाली. तेव्हापासून राजेंद्र ठोंबरे हे पक्षात निष्ठेने काम करत आहेत. शिवसेना जातीपातीचे राजकारण कधीही करत नाही. ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आम्हाला आहे.

फुलंब्री आणि जालना मतदारसंघात विधानसभेवर आणि लोकसभेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असे त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेना, युवा सेनेत प्रवेश केलेल्या कार्यकत्र्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. युवासेना जिल्हा युवा अधिकारी तथा नगरसेवक ऋषिकेश खैरे, संतोष माने, युवासेना सचिव तथा नगरसेवक राजेंद्र जंजाळ, फुलंब्री तालुकाप्रमुख राजेंद्र ठोंबरे, कॉलेज कक्षप्रमुख ऋषिकेश जैस्वाल, शहरप्रमुख बाबासाहेब डांगे, नगरसेवक किशोर नागरे, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, फुलंब्री विधानसभा संपर्कप्रमुख काकासाहेब मोटे, तालुका अधिकारी अभिलाष सोनवणे, तालुकाप्रमुख केतन काजे, पप्पू जासूस, अमोल जाधव, मनोज पिंपळे, विजय वाघचौरे, विजय गायकवाड, जितू यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवसेना, युवासेनेत प्रवेश करणारे सुश्मेश राजू प्रधान, अमित वाहूळ, राहुल गाडेकर, बाळू गंगावणे, बाबासाहेब गंगावणे, ऋषिकेश पगडे, अशोक शेवाळे, ऋषिकेश जाधव, गणेश चव्हाण, सिद्धार्थ पगारे, योगेश प्रधान, महेश लोखंडे, वैभव दांडगे, विकास थोरात, नारायण पुरी, चंद्रकांत गाडेकर, विशाल थोरात, विजय सुरडकर, बादल भालेराव, सचिन गायके, कृष्ण शिरसागर, अरिंवद सुरडकर, देवीदास सरोदे, दादाराव सुरडकर, संतोष कदम, दीपक केतकर, शुभम चव्हाण यांच्या सह शेकडो कार्यकत्र्यांनी आज प्रवेश केला. प्रास्ताविक उपतालुकाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी केले. शहरप्रमुख रमेश दुतोंडे, रमेश गंगावणे, उत्तम ढोके, सद्दाम शेख, अजय जैस्वाल, जुनेद खान , मोसिन खान, विशाल गंगावणे, रोहित सोनवणे, किशोर ठोंबरे, शाहरुख खान, उमेश दुतोंडे, सुरेश गंगावणे, राजू तायडे, भानुदास तायडे, बंटी गंगावणे, त्रिशूल तिवारी, सुशील जैस्वाल यांच्यासह असंख्य कार्यकत्र्यांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या