मराठा समाजाच्या पक्षाचे नाव ठरले, महाराष्ट्र क्रांती सेनेची स्थापना

1

सामना ऑनलाईन, मुंबई

रायरेश्वराच्या साक्षीने सकल मराठा समाजाच्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली. या पक्षाचे नाव महाराष्ट्र क्रांती सेना असल्याचं मराठा क्रांती संघटनेचे संस्थापक सुरेश पाटील यांनी सांगितले आहे. पक्ष स्थापन करण्याची घोषणा सप्टेंबरमध्ये करण्यात आली होती.  घोषणा करतेवेळी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला हा पक्ष बांधला जाणार नसल्याची शपथच रायरेश्वर मंदिरात घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार या पक्षाच्या स्थापनेसाठी जमलेल्या मंडळींनी रायरेश्वराच्या चरणी नतमस्तक होत पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली.

सुरेश पाटील यांनी पक्षाबाबत माहिती देताना सांगितलंय की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा पक्ष 5 जागांवर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले आणि काही शेतकरी संघटनांनी या पक्षाला पाठिंबा देण्याचं ठरवलं असल्याचं पाटील यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं आहे.