मराठा आरक्षण: १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करा!

10


सामना ऑनलाईन । मुंबई

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगानं आज उच्च न्यायालयात प्रगती अहवाल सादर केला. त्यावेळी 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मागासवर्ग आयोगाने आज कोर्टात मराठा समाजाचा प्रगती अहवाल सादर केला. तसंच येत्या चार आठवड्यात अंतिम अहवाल सादर करण्यात येणार असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. त्यामुळे न्यायालयानं येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाकडून आयोगाला दिले आहेत.

मराठा आरक्षणाचा प्रश्नमार्गी लावण्यासाठी कालमर्यादा ठरवून देण्याची मागणी याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यावर न्यायालयाने लवकरात लवकर हे प्रश्न लावण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते.

आरक्षणसाठी गेल्या दोन वर्षात मराठा समाजाने आधी शांततेत मोर्चे काढले होते. मात्र त्यानंतरही सरकारने ठोस पावलं न उचलल्याने संतापलेला मराठा समाज हा रस्त्यावर उतरला आणि ठोक मोर्चे कढून आपला प्रश्न सरकारसमोर मांडला.

आपली प्रतिक्रिया द्या