राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे

सामना ऑनलाईन। मुंबई

मराठा समाजाला शैक्षणिक संस्थामध्ये आरक्षण मिळावे, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी यासह इतर प्रमुख मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा मोर्चातर्फे आज राज्याच्या विविध भागात मोर्चे काढण्यात आले.  मोठ्या संख्येने मराठा तरुण तरुणी  या मोर्चांमध्ये सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणी वाहतुककोंडी झाल्याचे पाहावयास मिळत आहे.तर संभाजीनगरमध्ये पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याचे वृत्त आहे.

महामूक मोर्चाप्रमाणेच हा मोर्चा शांततेत करण्याचे आवाहन आयोजकांनी आंदोलकांना केले आहे. आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. यात वाहनांवर दगडफेक करु नये,अग्निशमन दल,रुग्णवाहिकांना मार्ग काढून देणे, आणि पेलिसांना सहकार्य करण्याच्या सूचना आयोजकांनी आंदोलनात सहभागी होणा-यांना दिल्या आहेत.  यापार्श्वभूमीवर ठराविक ठिकाणीच हे आंदोलन केले जाणार आहे.

अॅट्रासिटी कायद्यात बदल व्हावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी यासह प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.राज्यभरात सुरु असलेल्या या आंदोलनामुळे मुंबईत दादर लालबाग येथे वाहतूक कोंडी झाली होती