या कलाकारांची ‘लूजरवाली गरबा स्टेप’ पाहा आणि मनमुराद हसा..

सामना ऑनलाईन । मुंबई

नवरात्र म्हटलं की फिल्म इंडस्ट्रीचं एक वेगळंच सेलेब्रेशन असतं. मराठी कलाकारही यात मागे नसतात. सोशल मीडियापासून ते टेलिव्हिजन चॅनेल्सपर्यंत मराठी तारेतारकांचं नवरात्र सेलिब्रेशन जोरात सुरू असतं. यात आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने या सेलिब्रेशनला एक नवीन तडका लावला आहे.

तेजस्विनीच्या म्हणण्यानुसार नटून थटून, सुंदर साज लेवून आणि खूप अदाकारी दाखवत प्रत्येकजण गरबा खेळतो. पण या उत्साही गरबाप्रेमींमध्ये असेही काही जण असतात ज्यांना गरबा जमत नाही. पण आवड आहे म्हणून ते गरबा खेळतात आणि एन्जॉयही करतात. गंमत म्हणजे अशाच लोकांच्या गरबा स्टेप्स इतरांच्या कायम लक्षात राहतात.

तेजस्विनीने अशाच गरबा स्टेप्सना घेऊन एक चॅलेंज सुरू केलं – #loserwaligarbastep (लूजरवाली गरबा स्टेप) ज्यात तिने तिची आवडती लूजरवाली गरबा स्टेप करून दाखवली आणि त्याचा व्हिडिओ तिने आपल्या सोशल मीडियावर टाकला. एका दिवसात या व्हिडीओने लाखांचे व्ह्यूज ओलांडले आहेत. तेजस्विनीने या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ जाधव आणि नम्रता आवटे या दोन कलाकारांना #loserwaligarbastep करून दाखवण्याचं चॅलेंज दिलं आहे. याच व्हिडिओप्रमाणे सिद्धार्थ जाधव आणि उमेश कामत यांनीही आपली लूजरवाली गरबा स्टेप सोशल मीडियावर शेअर केली आहे.

तर पाहा या कलाकारांच्या लूजरवाल्या गरबा स्टेप्स –

तेजस्विनी पंडित-

सिद्धार्थ जाधव-

उमेश कामत-