फेसबुकवरील पोस्टमुळे कर्नाटकात मराठी तरुण संकटात

4

सामना ऑनलाईन । बंगळुरु

कर्नाटकमध्ये फेसबुकवर भाषिक प्रश्नावरुन टिप्पणी केल्यामुळे एका मराठी तरुणाविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. प्रितीश पाटील असे य़ा तरुणाचे नाव असून तो मूळचा महाराष्ट्राचा आहे.

आभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला प्रितीश बंगळुरुमध्ये शिकतो. भाषेवरुन त्याचा एका बस वाहकाशी वाद झाला होता. फेसबुकवर त्याने या घटनेचा वृत्तांत पोस्ट केला व दक्षिण भारतीय लोक हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकत नाहीत, पण त्यांची भाषा शिकण्यास इतरांना भाग पाडतात अशी टिप्पणी केली.

प्रितीशच्या या पोस्टवरुन सोशल मिडीयात खळबळ उडाली असून बंगळुरुतील स्थानिक त्याच्याविरोधात एकत्र आले आहेत. दरम्यान,प्रितीशने आपल्या पोस्टबाबत दिलगीरी व्यक्त केली. पण कन्नड भाषेसाठी काम करणा-या एका संस्थेचा कार्यकर्ता संदीप पार्स्वनाथ याने प्रितीश विरोधात खटला दाखल केला आहे. हा खटला रद्द करण्याची याचिका प्रितीशने कर्नाटक उच्च न्यायालयात केली. मात्र, उच्च न्यायालयाने हा खटला रद्द करता येणार नसल्याचे स्पष्ट करत प्रितीशची याचिका फेटाळून लावली आहे.